बिहार मधे 'नितीश' बहार.

0
तुम्ही त्यांना 'पलटूराम' म्हणा किंवा त्यांचे 'दात पोटात आहे' असे म्हणा ते प्रत्येकवेळी तुम्हाला हुलकावणी देऊन सत्तेत येतील आणि आल्यावर टिकतील सुध्दा.. बिहारच्या राजकारणात ३ दशकावरून अधिक काळ आपला पाय जमवणारे,२२ वर्षांत ८ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले "नितीश कुमार" पुन्हा एकदा आपल्या जादुई करिष्म्याने भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय जनता दल सोबत युती करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. सध्या देशात भाजपा सोबत जाण्यास नेत्यांची, छोट्या छोट्या पक्षांची चढाओढ होत असताना, प्रवाहाच्या विरुद्ध नितीश कुमार गेलेले आपण पहात आहो. भाजपाला ते सोडचिठ्ठी देणार याची चाहूल गेल्या काही दिवसांपासून लागली होती. मागच्या रविवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक होती त्या बैठकीत के चंद्रशेखर नव्हतेच पण जास्त चर्चा झाली ती नितीश कुमारांच्या अनुपस्थितीची. २२ जुलै ला मावळते राष्ट्रपतींना अलविदा देण्यासाठी रत्रिभोजन ठेवले होते, त्यात नितीश कुमार गैरहजर होते. त्यामूळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सत्तेच्या चौकांत चालली होती. राष्ट्रीय जनता दल लालूंचा पक्ष सध्या तेजस्वी यादव सूत्रधार आहे त्यांच्यासोबत नितीश कुमारांच्या जनता दल (संयुक्त) यांनी सुलाह केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढच्या २०२३ च्या जून/जुलै पर्यंत नितीश कुमार सत्तेत मुख्यमंत्री राहतील आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री राहतील. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मधे तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील आणि नितीश कुमार महागठबंधनाची सूत्रे हातात घेतील व २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना कडवा विरोधक होण्याची तयारी करतील.

नितीश कुमारांनी भाजपशी युती का तोडली?

भाजपची पहिल्यापासूनची एक वाईट सवय आहे, ज्या राज्यात ते कमकुवत आहे त्या राज्यात एखादया प्रादेशिक पक्षासोबत युती करायची. सत्तेत यायचे. हळूहळू आपला पक्ष मोठा करायचा आणि युतीतला पक्ष कमकुवत करून आपली वोट बँक वाढवायची. दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक चालवण्याची पद्धत भाजपाने तामिळनाडूत आमलात आणली, महाराष्ट्रत आज आपण पाहतोय शिवसेना संपवण्यासाठी कीती कटकारस्थाने केली. नितीश कुमारांना हिच भीती होती की आपला पक्ष संपवू नये. भाजपाने २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान सारख्या हनुमानाला पाठबळ देऊन जनता दल च्या जागा कशा कमी होतील याकडे विशेष लक्ष दिले आणि जनता दलचा रथ ४४ जागांवर थांबवला. नितीश कुमार हे सर्व गोष्टी जाणून होते पण योग्य वेळेची वाट पाहत होते. पाणी तेव्हा पुलावरून वाहू लागले जेव्हा रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी) यांना भाजपा पाठबळ देऊन एकनाथ शिंदे बनवू पहात होती. आरसीपी सिंहांना राज्यसभेची उमेदवारी भेटली नाही त्यामूळे ते नाराज होते. आरसीपी सिंह हे यूपी कॅडर चे IAS अधिकारी होते, त्यांना नितीश कुमारांनी राजकारणात आणले. त्यांना जनता दल संयुक्त चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. पूढे जाऊन त्यांना राज्यसभेचे खासदार बनवले. २०२१ मधे जनता दलच्या कोट्यातून केंद्रात मंत्री बनवले पण केंद्रात मंत्री बनवल्यावर ते भाजपच्या जवळ जावू लागले आणि नितीश कुमारांना संपवण्याचे कारस्थान चालु केले. २०२२ मधे त्यांना राज्यसभेची उमेदवारी भेटली नाही त्यामूळे त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मग त्यांनी प्रसार माध्यमातून नितीश कुमारांवर टीकाश्र सूरु केले. आरसीपी सिंह राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे टिकिट वाटपात त्यांचा हात असल्यामुळे आमदारांच्या जवळचे होते, भाजपा त्यांना एकनाथ शिंदे बनवू पहात होती. जनता दल संयुक्त मधे फुट पाडून नितीश कुमारांची राजनीती संपवणायची तयारी होती. पण उद्धव ठाकरेंसारखे नितीश कुमार अनअनुभुमी नाही, ते बिहारच्या मातीतले पक्के पैलवान आहे, त्यांनी चोराच्या मनातले चांदणे वेळीच ओळखून भाजपची योजना भाजपवर पलटवली.
जातीचे समीकरण पहाता १५% ज्या उच्च जाती आहे त्यात ब्राह्मण, राजपूत, भुमिहार त्या भाजपा सोबत आहे, पण ५८% ओबीसी समाज जो पूर्ण बिहार मधे सगळयात मोठा आहे त्यात १५% यादव समाज जे लालूंच्या पक्षासोबत आहे,११-१२% कोरी, कुर्मी नितीश कुमारांसोबत आहे.
भाजपामुळे जे मुस्लीम वोट्स नितीश कुमारांपासुन दुरावले होते ते सुद्धा भविष्यात त्यांच्या सोबत येऊ शकतात.
 
सरकार पाडणे, सरकार बनवणे, आमदारांना घेऊन दुसऱ्या राज्यात जाने यापलीकडे जाऊन राज्यकर्त्यांनी विकासाचे सुद्धा राजकारण करावे आणि भाजपाने जो खेळ मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारसोबत आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंसोबत केले पहाता प्रत्येक महाराष्ट्रानंतर आणि मध्यप्रदेशानंतर बिहार असतो हे म्हणायला वावगे ठरणार नाही. एक दिवस सगळे प्रादेशिक पक्ष संपून फक्त भाजपा उरेल ह्या जे पी नड्डा यांच्या वक्तव्याचा भाजपाने पुन्हा एकदा विचार करावा..

- आकाश अर्जुन दहे
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top