#कोसला ५०-५५ वर्षा नंतरही एखादी कादंबरी समाज मनावर गारुड करते, तरुणांपासून ते व्रुध्दापर्यंतच्या वयोमानावर ती सारखाचं प्रभाव पाडते,यापेक्षा अजून साहित्यात क्षेत्रात वलय कशाचं असू शकेल.
"खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे.काही थोरं करावं म्हणून हा सांगवीकर उच्चशिक्षणासाठी पुण्यात येतो. राहण्याची सोय म्हणून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असतो, याच ठिकाणी त्याला नविन मित्र, शिक्षक भेटतात. पुढे सांगवीकर स्वकर्तुत्वाने कॉलेजचा जनरल सेक्रेटरी बनतो. कॉलेजचा डोलारा सांभाळत असताना त्याला अनेक अडथळे येतात, आरोप होतात. या आरोपांना सामोरे जात असताना सांगवीकरांच्या जीवाची झालेली घालमेल लेखक भालचंद्र नेमाडे अशा कुशलतेने मांडतात की ते वाचुन वाचकाचा जीव भांड्यात पडल्या खेरीज राहत नाही.लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो.गावात आल्यानंतर सांगवीकरची होणारी फरफट वाचकाला खूप काही शिकवून जाते. शेवटी सांगवीकर पुढे जे व्हायच ते होऊदे!! सगळेच निरर्थक आहे तर मग चिंता का करायची?' या तत्त्वज्ञानापाशी येऊन पोहोचतो. वरवर पाहता ही कथा खूप साधी आणि सोपी वाटेल पण ती तितकी साधी आणि सोपी नाही. कोसला ही एक केवळ कादंबरी नसून तुमच्या माझ्या आयुष्यातील जिवंत प्रवास, स्वातंत्र्य विश्वात नेणारा एक अविस्मरणीय अनुभव, सुटकेचा निश्वास, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असं बरच काही
कोसला वाचताना प्रत्येक क्षणाला वाटतं हा पांडुरंग मीच तर नाही ना? ही माझीच कथा आहे त्याची अंतरंगात होणारी घुसमट आणि डोक्यात येणारे अवस्थ विचार हे माझेच असावेत जणूं.
समीक्षा : ओंकार शेलार