कोंदणात हिरा जडावा
तारकांच्या गराड्यात
पुनवेचा चंद्र आभाळी झळकावा!
धीरगंभीर रात्र
नितळ पाण्याकाठी यावी
गुलाबी थंडी अलगद
तिच्यावर मांडावी
शिशीरेची झुळुक पिंगा घालत पळावी
सोबतीने रातराणी मोहीत करून जावी
त्या भयाणजागी सोबत स्वतःचीचं असावी
मनातल्या प्रश्नांची अलगद उत्तरे सापडावी
प्रगल्भ, पोक्त काय असतं ते स्वतःत शोधावं
एकांत जागी एकांतात स्वतःला जागवावं!!
- वि.Rajè