जातीला नजर
इथे मानसाची नजर माणसाला लागली की मानुस आजारी पडतो की नाही हे माहीत नाही पण, माणसाची नजर जातीला लागली की मानुसच आजारी पडतो हे मात्र चुकीचं नाही ...एक असा आजार जो माणसाला बुध्दीने कुजवून टाकतो...
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ... लहान पणी .... याचा अर्थ माहित न्हवता तरीही आग्रह असायचा की हे बोललच पाहिजे .... पण आज प्रत्यक्षात हे सगळं चित्र वेगळच आहे ... आज बोलल जात भारत माझा देश आहे आणि मी एक विशिष्ठ जातीचा आहे आणि तो एक विशिष्ठ जातीचा आहे .. खरंच या जातीने लोकांच्या बुध्दीची राख करून टाकलीय ... सर्व धर्म समभाव म्हांनाराच आज जाती विरोधात उभा असतो मग हा सगळा दिखावा कश्यासाठी .. काय कळेना लोक कधी कुठे कसे कोणत्या थरावर जातील लोकांची मने जपण्यासाठी ... जात ही संकल्पना नष्ट करा म्हणणारी कालांतराने जागी होतात आणि शेवटी स्वतःच्या जातीचा अभिमान वाटून घ्यायला सुरुवात करतात ...
---आकाश ना दोडमणी