लहानपन रानात गेले, clg शहरात n नौकरी metro-city त... तुम्ही म्हणता गावाकडे चला पण बेरोजगार व्हायची भीती आहे मनात...
शिक्षकांनी इमानदारी शिकवली समाजाने बेईमानी प्रसिद्ध केली... म्हणुन आता वेळेनुसार काय इमानी अन काय बेईमानी आम्हीच ठरवतो...
एक जण म्हणतो जग जवळ आलय, एक जन म्हणतो माणसं आता एकमेकापासुन लांब गेली... म्हणुन आता आम्ही कामाची मानस जवळ राहण्यासाठी प्रयत्न करत असतो ....
एकीकडे रात्र अन दिवस एक करणारे अन दुसरीकडे ७ च्या आत घरात येणारे... पण वेळ आल्यावर दोन्ही प्रकारचे चुकिचेच... म्हणुन आमचे ७ कधी वाजणार ते आता आम्हीच declare करत असतो...
मुल्यांशी compromise न करता जगायचे हे कळाले पण मुल्येच आता कळेनाशी झाली आहेत... कदाचित जुन्या पीढीच्या काही मुल्या नी कात टाकण्याची वेळ आली आहे, असा वाटुन नवीन वातावरणात नवीन मुल्ये तयार करतोय...
कोणाच्या खांद्यावर बसुन जग पाहायचे ते आधीच्या पीढीने समजावुन सांगितले... पण आतI 'काय ' पाहायचे अन पुढच्या पीढीला कोणाच्या खांद्यावर बसवायचे त्याची जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे ... N ही जबाबदारी आमची पीढी चांगल्या संघर्षाने योग्य रितीने पार पाडेल अशी आशा आहे...
- गौरी देशमुख
Much relatable...msta!
ReplyDelete