काश्मीरला कितीतरी विशेषणे लावून संबोधले जाते पृथ्वीचे स्वर्ग, नंदनवन इत्यादी पण त्याची दुसरी बाजू म्हणजे भळभळत्या जखमा. अशीच एक जखम म्हणजे 1990 ची, ती दुसरी फाळणीच होती. लाखोंच्या संख्येने काश्मिरी पंडितांना स्वतःचे घर सोडून स्वतःच्या देशात शरणार्थी म्हणून जगावे लागले, या घटनेला आता तीस वर्षे होऊन गेली. एकाच रात्रीत हे सर्व घडले नाही 1980 पासून या सर्वांसाठी कश्मीरी जमीन तयार होत होती.
1982 मध्ये शेख अब्दुल्ला गेले त्यांच्या जागी फारूक अब्दुल्ला आले पण त्यांचे सरकार कोसळले काँग्रेसच्या केंद्र सरकारने त्यांच्या मागचा हात काढून घेतला त्याच दरम्यान जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मजबूत होत होती. पूर्ण जगात कुठेही काही घडले तरी कश्मीर पंडितांना ते सोसावा लागत होतं जसं जेरुसलेम मध्ये अल अक्सा मस्जिद वर हल्ला, भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारत जिंकला तर पंडीतांच्या घरावर दगड फेकले जायचे, 15 ऑगस्टच्या रात्री लाईट जरी चालू ठेवला तर तेथील लोक दगडे फेकायचे. अशा सर्व गोष्टी मध्य 1980 च्या दरम्यान चालू झाल्या होत्या.
एखादा मेजॉरिटी समाजाचा माणूस घरी आला आणि त्याने कश्मिरी पंडीतांच्या घरी पाहिले की एखाद्या नवीन खोलीचे बांधकाम चालू आहे तर तो म्हणायचा कशाला खर्च करत आहात आज नाहीतर उद्या हे आमचच होणार आहे कश्मिरी पंडित या गोष्टीला हसल्यावरी घेऊन जायचे. 18 एप्रिल 1986 ला भारत पाकिस्तान मॅच शार्जाह येथे होती पाकिस्तान ला शेवटच्या बॉल मध्ये चार धावा लागत होत्या फलंदाज होता जावेद मियांदाद आणि गोलंदाज होता चेतन शर्मा, शर्मा ने फुल्ल टॉस टाकला आणि जावेद ने त्या बॉल वर षटकार मारला आणि पाकिस्तान या सामन्यांमध्ये जिंकले पुढल्या काही मिनिटात वाटले की कश्मीर मध्ये दिवाळीच आहे, जेवढ्या प्रकारचे फटाके होते ते सगळे काश्मीर मधे त्या वेळेस वाजवले गेले, आणि जसे खेळाडू शँपेन पेऊन जश्न करतात तसेच काश्मीर मधे लोक लिम्का पिउन जश्न करतं होती.
1989 मध्ये JKLF ने मुक्ती सयिद च्या मुलीचे अपहरण करुन पाच आतंकवाद्यांना सोडून घेतले होते यावरून त्यांना कळून गेले की भारत सरकारला आपण वाकायला लावले तर ते रेंगाळू पण शकतात मग त्यांनी आपली योजना चालु केली.
1989 नंतर काश्मिरी पंडितांना हळूहळू मारायला सुरुवात झाली त्याचा पहिला बळी गेला टीका लाल टपलू. त्याच काळात भरपूर तरुण मुले पाकव्याप्त काश्मीर मध्ये जाऊन ट्रेनिंग घेऊन काश्मीर मध्ये हिंसाचार घडवत होती.
शेवटी आली 19 जानेवारी ची काळीकुट्ट रात्र त्या रात्री जे घडले ते भारताच्या इतिहासाला कलंक लाऊन जाणारे आहे. जवळजवळ सात लाख लोक रस्त्यावर उतरून घोषणा करत होते, मस्जिद मधल्या लाऊडस्पीकर वरून घोषणा चालल्या होत्या, त्या घोषणा होत्या --
यहां क्या चलेगा, निजाम ए मुस्तफा ,
ला शर्किया ला गर्बिया , इस्लामिया इस्लामिया . (What will work here? The rule of Mustafa no eastern no western only islamic islamic)
जल जला आया है, कुफ्र के मैदान में
लो मुजाहिदीन आ गए मैदान में ।
(An earthquake has occurred in the realm of infiders the mujaheed has come out to fight)
आणि शेवटची घोषणा होती ती तर मनाला घाबरून टाकणारी होती --
कश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे, आम्हाला आमचा पाकिस्तान पाहिजे, तुम्हा पुरुषां वाचून तुम्ही निघून जा फक्त तुमच्या बायका इथे ठेवा.
याच रात्री एका बाईने स्वतःचा लहान मुलीच्या तोंडात बिस्किट कोबुंन ठेवले कारण तिच्या रडण्याचा आवाज बाहेरचा लोकांना जाऊ नये म्हणून, आणि याच रात्री एका बाईने तर हातात चाकू घेऊन ठेवला कारण त्यावेळेस स्वतःची इज्जत वाचवायची हाच प्रश्न होता, ती पहिल्यांदा तिच्या मुलीला मारणार होती आणि नंतर स्वतःला.
कशा परिस्थितीत ते लोकं राहिले.
ऐसे माहोल में जिये वो लोग हम होते तो खुदकुशी कर लेते।
1947 आली महात्मा गांधी फाळणीचा वेळेस बोलले होते की मला प्रकाशाचे किरण फक्त कश्मीरी लोकांमध्येच दिसत आहे कारण 1947 मध्ये पाकिस्तानचे आतंकवादी/उग्रवादी जेव्हा श्रीनगर च्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी चालले होते तेंव्हा मकबूल शेरवानी याने त्यांना चुकीचा रास्ता दाखून भरकटून ठेवले नाहीतर आज जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान मधे असता. तो एक काश्मीर होता जात धर्म विसरून सगळे लोक कश्मीरी होते आणि 1980- 90 चा एक कश्मीर.
काही लोक बोलतात की काही आतंकवादी लोकांमुळे 1990 हिंसाचार घडला सामान्य माणसांचा त्यात हात नव्हता पण एक घटना सांगतो- 25 जानेवारी 1998 ची गोष्ट वांधामा या गावी कश्मीरी पंडिताच्या घरी उग्रवादी आले आणि २६ जणांना घराच्या अंगणात जाऊन बंदुकीच्या गोळीने मारून टाकले आणि त्या बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज भारतीय सैन्याला जाऊ नये म्हणून स्थानिक लोकांनी मस्जिद मधल्या लाऊडस्पीकर चा आवाज वाढवून दिला या गोष्टीवरण समजू शकते स्थानिक लोक सुद्धा त्यात मिसळले होते. या घटनेला (wandhama massacre) म्हणतात.
सध्या कश्मीर आपली मूळची संस्कृती विसरून चालले आहे अनंतनाग ला आता इस्लामाबाद म्हणतात आणि शंकराचार्य टेकडी ला तक्ते सुलेमान.
1990 नंतर कितीतरी सरकार येऊन गेले पण कोणत्याच सरकारने कश्मिरी पंडीतांसाठी साठी काही केले नाही ज्याने त्याने आपापल्या परीने राजकीय पोळी भाजून घेतली. काहींनी चित्रपट काढून पैसे कमावले, त्या पैशातून काश्मिरी पंडितांच्या आयुष्यात ज्योत लावण्याचा प्रयत्न कधी झाला नाही.
आज कश्मीरी पंडित शंभर टक्के साक्षर लोक आहे, आपल्या जमीन-जुमला गेल्यावर शिक्षणच आयुष्य समृद्ध करण्याचे साधन राहिले, तो समाज आज जम्मूपासून जोहा्सबर्ग पर्यंत पसरलेला आहे पण आपल्याच भूमीत कधी परतू शकला नाही.
मुझसे मेरा दर्द न पूछाे मैं कश्मीरी पंडित हूँ
अपने घर में मारा गया टुकड़ो टुकड़ो में खंडित हूँ
बेदर्द हवाओं ने देखा घाटी में धाेखा खाया हूँ
खामाेश खड़ी थी दुनियां अपनाें की लाशें पाया हूँ
शाेर वक़्त में जिन्दा है चीत्काराें से मैं मंडित हूँ
मुझसे मेरा दर्द न पूछाे मैं कश्मीरी पंडित हूँ
याद है मुझको जुल्म पुराना चुप चाप खड़े थे लाेग
लुट रही थी अस्मत मेरी मरी थी माँ की काेख
हमें बचाने काेई न आया खुद के वतन में दंडित हूँ
मुझसे मेरा दर्द न पूछाे मैं कश्मीरी पंडित हूँ
- अमर उजाला
आकाश अर्जुन दहे
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली.