मामाचं पत्र

0


तो काऴ सन 1991- 92 चा मी गावच्या प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होते.शाळेची घंटा वाजली तशी मी पाठीवर दप्तर घेऊन सर्वांच्या अगोदर वर्गाच्या बाहेर पडले अन् घराच्या रस्त्याला उधळत सुटले.रोज मैत्रिणीच्या घोळक्यात खेळत खेळत घरी येणारी मी आज कोणाचाच विचार न करता थेट घर गाठलं. दारातूनच दप्तर घरात टाकलं दप्तर कसलं ते! आजीने दिलेली बाजारची जुनी नायलॉनची पिशवी त्यामध्ये शाळेतून फुकटात मिळालेली तीन चार पुस्तके अनेक पाटी,पेन्सिल, अंकलिपी इत्यादी. अभ्यासाचे साहित्य दुपारी आमच्या शाळेत पोस्टमन काका आले होते. सायकल वरून येणारे पोस्टमन काका खाकी शर्ट,खाकी टोपी, आणी धोतर नेसलेले तसेच खांद्यावर अडकवलेली खाकी रंगाची बॅग अशा वेषात सायकलचा जड पेंडल मारत मारत टपाल घेऊन शाळेत आले. खाकी रंगाच्या पिशवीत कुणाकुणाचा आनंद घेऊन ते आले असतील बरे.? हा प्रश्न आम्हाला पडलेला गुरुजींनी एक एक पत्र वाचून मुलांच्या घरचे तसे शेजाऱ्यांचे पत्र ज्यांच्या त्यांच्याजवळ दिले त्यातच एक पत्र मलाही दिले.पत्र मिळाल्यानंतर मी तर आनंदाने बेडूक उड्याच मारायला लागले. कितीतरी आनंदाचे लाडू माझ्या मनात फुटत होते कधी एकदाची घरी जाईल असे वाटत होते. 

बातमीच तशी आनंदाची होती घरी आल्यावर दप्तरातले पत्र काढून दारातूनच दप्तर घरात भिरकावले आणि थेट आई ज्या  वावरात काम करते ते वावर गाठले मी धावत आलेली बघून आई जरा घाबरलीस ! मला विचारले! का एवढी धावत आलीस तेव्हा मी म्हणाले ,अगं मामाच पत्र आलंय तशी आई हातातलं खुरपं खाली टाकून मला म्हणाली मामाचं पत्र! काय म्हणतोय मामा ? वाच बघू पटकन मी पत्र वाचायला लागली तसे आजी ,काकू ,आई सर्वजणी काम बंद करून पत्रात काय लिहिलय ते ऐकू लागल्या. पत्रात लिहिलेलं तीर्थ स्वरूप आत्या मामा म्हणजे माझे आजी आजोबा यांना माझा साष्टांग दंडवत दाजी, अक्का ,लहान ताई यांना नमस्कार माझ्या भाच्यांना गोड गोड पप्पी ..अक्का इकडे आई बाबा आम्ही सर्व खुशाल आहोत. शेतीची कामे चालू आहेत तुम्ही तिकडे खुशाल असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.माझ्या भाच्यांना कधी सुट्ट्या लागणार आहे ?दिवाळीला घ्यायला येतो बाकी सर्व ठीक आहे.पत्र मिळताच उत्तर देणे...
               
                  कळावे आपला नम्र. 

पत्र पूर्ण झाले पत्र ऐकून आईचं आकाश पाताळ एक झालं. चेहऱ्यावर माहेरी जाऊन आल्याचा आनंद वाटत होता. डोळ्यात आनंदान गंगा,यमुना भरभरून वाहत होत्या; पत्रातल्या दोन ओळीतच सर्व खानाखुना ती समजत होती . वर्षातून दोनच वेळा माहेराला जाणाऱ्या आईला येणाऱ्या पत्रातल्या दोन ओळीत श्रावणातल्या गार गार सरी प्रमाणे सुकावीत होत्या तिचे मन पाखराप्रमाणे क्षणात माहेराला जाऊन आल्याचा भासवीत होतं. आज मात्र जग बदललंय संपर्काची साधने बदलली, जगण्याचा वेग वाढला नातेसंबंध जपायला कोणाला कुणाकडे जायला वेळच राहिला नाही. सोशल मीडियामुळे जग जवळ आले पण आपली जवळची माणसं दुरावली. संपर्काची संवादाची साधने बदलली जगण्याचा दृष्टिकोन बदलला आजच्या फोन इंटरनेटच्या वाढत्या वेगामुळे जीव दडपून जायला होतो.हे सर्व अनाकलनीय अफाट आहे तरी प्रचंड हवस वाटणार आणि गुंतवून ठेवणारही आहे.आज सर्व जगच एकमेकांच्या विरोधी भूमिकांच्या खऱ्या-खोट्या हिंदोळ्यावर विराजमान झाले आहे .आज आपल जीवन आपल्या लहानपणीच्या झोक्यासारखं झालंय ; आपण झोक्याचा वेग वाढवून आनंद लुटण्याचा प्रयत्न करायचं.पाय जमिनीला टेकले की वेग आवरला जायचा; पण झोका सुटला की पोटात गोळा यायचा खूप भीती वाटायची तरी वेड्यासारखा आकर्षण आज झोका नाही. पण वेग आहे मन, विचार ,भावना असतीर झाल्या  आहेत.

माणसाच्या अन्न, वस्त्,र निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये फोन सुद्धा चौथी मूलभूत गरज होऊन बसले आहे. फोनमुळे जग जवळ आले खरे पण आपल्या जवळच्याच माणसांचा संपर्क तुटला सतत फोन मध्ये व्यस्त असणारे माणसे प्रत्यक्षात संवाद विसरत चालले.. कुटुंब नातेवाईक यांनी एकत्र येण्याच्या बोलण्याच्या वेळा कमी झाल्या.दुसऱ्याने अपलोड केलेल्या फोटो मधला खरा वाटणारा क्षण आपण लगेच लाईक करतो.पण आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारा पाऊस आपली नजर खेचून घेऊ शकत नाही कारण काही बघण्यातली शोधण्यातली दृष्टी आपण हरवून बसलो आहे.आज फोन इंटरनेटमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण पोहोचू शकतो आपल्या जवळच्या मनातून दुरावत चाललोय पूर्वी मुले मैदानी खेळ खेळायचे त्याच्याने शरीर तंदुरुस्त राहायचे.आता तासंतास मोबाईल मध्ये व्यस्त राहून मूकबधिर झालेत! एकलकोंडी झालेत, आमच्या वेळेला वडीलांनी आमच्यासाठी निवडलेली स्थळे त्यांच्या पसंतीचे मुलगा धडधाकट, पोटापूरती शेती, दुभत्या गाई-म्हशी  जेनेतरून कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल.आपली मुलगी ऊपाशी मरणार नाही ह्या विचारांची कुटूंब व्यवस्था भक्कम ईमारती सारखी उभी आहे.मात्र आजचं मुला-मुलींना दिलेल स्वातंत्र एकमेकांच्या आवडी निवडीला मोकळ प्राधान्य पूर्ण कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली. अगदी पती-पत्नीमध्ये सुद्धा न जुळवता थेट घटस्फोट जेथे पती-पत्नीचे सूत्र जुळत नाही. तेथे मुलाबाळांचे भविष्य काय घडणार? प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य हवं असतं यातून परस्पर विश्वास हरवत चाललाय !
मी असे मुळीच म्हणत नाही की सोशल मीडियामुळे सर्व तोटे झाले फायदेही झालेत पण नको त्या गोष्टीमुळे तरुणाई मध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले. फोनवर लग्न जमने क्षणात ते मोडलेचेही आपल्या लक्षात येतात .फोनमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले अनेक वेळा मुलींच्या विनयभंगाच्या बातम्या आपण बघतो खरे बघता फोन मुळे बऱ्याचश्या गोष्टी सोप्या झाल्यात.पण बरेचशे तोटे आपल्या ला सहन करावे लागत आहे.फोनच्या व्यसनामुळे बरेचसे मुले एकलकोंडी बनली आहेत फोन ही गरजेचा भाग बनला गरजेची आवड ,आवडीची  सवय आणि सवयीतून व्यसन जडले. आपल्याला यातून सावरायला पाहिजे. आपण गरजेपुरताच वापर करायला पाहिजे फोनचा नाहीतर एक दिवस असा उगवेल की उद्याची पिढी मतिमंद,मूकबधिर तयार व्हायला वेळ लागणार नाही.मोबाईलचे फायदे लक्षात घेता आजच्या तरुणांनी त्याचे दुष्परिणामही लक्षात घ्यायला हवेत....आज खर्या अर्थाने मामाचं पत्र हरवलयं...
आशा आहेर (खिरकाडे)
8999467148...
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top