तालिबान - वर्षपूर्ती

0

जगज्जेता सिकंदर जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तीन वर्षे राहून सुद्धा त्यावर कब्जा मिळवन्यास असमर्थ राहिला तेव्हा सिकंदरच्या आईने त्याला पत्र पाठवले आणि प्रश्न केला की पूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदरला एवढ्या छोटा अफगाणिस्थान जिंकण्यास अडथळा तयार होतोय तेव्हा सिकंदरने आईला अफगाणिस्थानमधील तीन प्रदेशातली माती पाठवली आणि स्वतःच्या बागेत टाकायला लावली आईने तसेच केले पुढच्या दिवसापासून सिकंदरच्या आईच्या देशात युद्ध चालू झाले, लोक एकमेकांना मारू लागले आईला स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळून गेले. ही एक कहाणी आहे पण खरे मानायला काही हरकत नाही. कारण आत्तापर्यंत बाहेरच्या जेवढ्या देशांनी अफगाणिस्तानवर सत्ता प्रस्थापित करायचा प्रयत्न केला ते सगळे अयशस्वी झाले. अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्याचे मनसुबे सगळ्यांचे का आहे/होते? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो त्याचे उत्तर अफगाणिस्तानचे भौगोलिक स्थान.

१८१३ ते १९१७ मध्ये 'ग्रेट गेम' या नावाने ओळखला जाणारा खेळ रशिया आणि ब्रिटिश सत्तेत चालू होता. त्याचं मुख्य ठिकाण अफगाणिस्तानातच होते.
अलेक्झांडर याच्या नेतृत्वाखाली मॅसिडोनियायांनी राज्य केले ते जाताना मागे ग्रीक, बुद्ध परंपरा ठेवून गेले नंतर अरबांनी येथे राज्य केले. तेथे इस्लाम घेऊन आले. गझनीच्या महंमदाने इथूनच इराण ते भारत अशा प्रदेशावर राज्य केले. १२१९ साली मंगोलच्या चेंगिज खानने राज्य केले ते जाताना एक नवीन जमात सोडून गेले. मंगोल आणि स्थानिक यांच्यात संकरन होऊन हजारा जमात तयार झाली. त्यांना दाढी-मिशा कमी म्हणुन तालिबान्यांच मुख्य लक्ष. पुढे लोदी,बाबर, अहमद शाह दुर्राणी यांनी राज्य केले. ब्रिटिशांनी सुद्धा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाले. त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज्य करण्यास सुरुवात केली. 1973 मध्ये झहीर शहा यांची राजवट त्यांचा भाचा सरदार मोहम्मद दाउद यांनी उलथून टाकली आणि अफगाणिस्तानात अशांततेच्या गर्तेत सापडला.
                        मुल्लाह ओमर - तालिबानचा प्रणेता

1978 मध्ये मोहम्मद दाऊदचा तक्तापलत करण्यात आला कारण तो सुधारणावादी होता. तो PDPA (पीपल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान) हटवण्याचा प्रयत्न करीत होता. 1965 मध्ये डाव्या विचारांनी चालू झालेल्या PDPA पक्षात दोन भाग होते परचम आणि खलक. त्यांना अर्थातच सोव्हिएतचा पाठिंबा होता. परचाम आणि खलक यांच्यात सुध्दा वैमनस्य होते, परंतु मोहम्मद दाऊदला बाजूला सारण्यासाठी ते एकत्र आले. या सर्व 1978 च्या घडामोडीला सौर क्रांती म्हणून जगभरात ख्याती मिळाली. PDPA च्या अंतर्गत भांडणामुळे रशियन फौजा अफगाणिस्तानच्या भूमीत उतरल्या. आणि शांतता प्रस्थापित करण्याचा आणि अफगाणिस्तानवर स्वतःचा अंमल बसवण्याच्या हेतूने तिथेच थांबल्या. तो काळ शीतयुद्धाचा होता.
रशियन फौजांना अफगाणिस्तामध्ये आलेल्या पाहून अमेरिकेच्या डोळ्यात ती गोष्ट सलायला लागली आणि त्यांनी त्यांचे क्रुरकर्म चालू केले. पाकिस्तानला हाताशी धरून मुजाहिदांना पैसे, हत्यारे देणे चालू केली. सेंट्रल इन्वेस्टीगेशन एजन्सी CIA ने ऑपरेशन सायक्लोन चालू करुन मुजाहिदांना पोसु लागले. सरफिर,कट्टरवादी तरुण मुस्लिम पूर्ण जगातून अफगाणिस्तानमध्ये जिहाद करण्यास येऊ लागले आणि सौदी अरेबिया, पाकिस्तान, अमेरिका त्यानं पोसू लागले. मुजाहिदांना एकच काम रशियन फौजांना माघारी पाठवायचे.1989 साल उजाडले रशियायात नवे राष्ट्राध्यक्ष आले मिखैल गोरबाचेव हे उदारमतवादी आणि सुधारणावादी होते त्यांनी आपले सैनिक मायदेशी बोलावून घेतले. यात कोणाचाच लाभ झाला नाही ना रशियाचा ना अमेरिकेचा. अमेरिकेने ज्यांना पोसले त्याच मुजाहिदांनी नंतर अमेरिकेच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या. 
1989 मध्ये रशियन अफगाण सोडून गेले. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू झाली. नजिबऊलाहची सरकार पाडण्यात आली.


 1994 मध्ये मुल्लाह मुहम्मद ओमर यानी तालिबान संघटना चालू केली. तालीब म्हणजे विद्यार्थी. हा ओमर कधीकाळी रशिया विरुद्ध लढणारा मुजाहिदीन होता. त्यांनी पन्नास विद्यार्थ्यांना घेऊन तालिबान चालू केली. संघटनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. एक महिन्यात पंधरा हजार लोक जोडले गेले. एक एक शहर काबीज करत 1996मध्ये काबूलवर कब्जा करून घेतला.
अहमद शाह मसूद नॉर्दन अलायन्सचा नेता हा एकटा तालिबान विरुद्ध लढत होता पण त्याचा काय एवढ्या मोठ्या संघटनेविरूद्ध लगाव लागला नाही.
                                           अहमद शाह मसूद 

तालिबान कट्टरपंथी होते यात काही वाद नाही त्यांनी शरिया लागू केला. आणि अफगाणिस्तान अश्मयुगात जाऊन पडला एवढ्या काळोखात अफगणिस्तान गेला की प्रकाशाचा एक झोत पण दिसेनासा झाला. या शरीयाचा जबरदस्त फटका जर कोणत्या सामाजिक घटकाला बसला असेल तर ते म्हणजे महिला. सगळ्या स्त्रिया पडद्यानिशी झाल्या. रक्ताच्या नात्याशिवाय वा नवऱ्या शिवाय कोणत्याही पुरुषासोबत संभाषणाची बंदी होती. घराघरांच्या खिडक्यांना काळी पडदेही लावुन घ्यायचा फतवा निघाला. एक वैद्यकीय सेवा सोडली तर महिलांना घराबाहेर काहीही करायला बंदी होती.
डुकराचे मास, मानवी केसांपासून बनवलेली कोणती वस्तू, संगणक, टीव्ही, दारूकाम, छायाचित्र काढून घेणे आदी अनेक बिगर इस्लामी ठरवत बंदीच्या यादीत टाकण्यात आले. त्यांच्या धर्माच्या व्याख्येत स्रीशिक्षण बसत नव्हत.महिलांनी नोकरी करणे मान्य नव्हतं. अशा काळोखात अफगणी लोक जगत होती.
ओसामा बिन लादेन सुद्धा अफगाणिस्तानमधून आपली संघटना चालवत होता.
जे पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम. 1979 मध्ये मुजाहिद यांचे पोषण करून त्यांना मोठे बनवून अमेरिकेने रशियाला बाहेर काढले पण त्यांनाही माहीत नव्हतं तेच सरफिरे कट्टरपंथी एक दिवस अमेरिकेच्या जीवावर उठतील. आणि 9/11 घडला. अमेरिकेचे ट्वीन टॉवर दहशतवाद्यांकडून उडविण्यात आले. अमेरीका झोपेतून जागा झाला. आणि बुश यांचे लोकप्रिय भाषण 'You are either with us, or against us'.
2001 मध्ये अमेरिकेने स्वतःच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसवल्या आणि तालिबान्यांशी संघर्ष सुरू केला. तालिबान्यांना मागे सर्कवण्यात अमेरिका यशस्वी झाली परंतु संपवू शकली नाही. तालिबानी गावागावात लपून बसले.2005 मध्ये अफगाणिस्तान मध्ये निवडणुका झाल्या हमीद करझाई निवडून आले.
          हमीद करझाई - पहिले निवडूण आलेले राष्ट्रपती

 33% जमिनीवर सरकारची सत्ता होती आणि 18% जमिनीवर तालिबानची.
सरकारला मदत करण्यास अमेरिकेचे सैन्यात इथे तंबू ठोकून बसले. पण अमेरिकेत सुद्धा लोकांची भावना आता अशी झाली की अफगाणिस्तानमध्ये आपले सैनिक काय करत आहे.4500 अमेरिकन सैनिक आत्तापर्यंत मारले गेले. 2016 मध्ये ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले त्यांनी अमेरिकन जनतेला आश्वासन दिले की दोन वर्षात अमेरिकेचा एकही सैनिक अफगाणिस्थान मध्ये राहणार नाही.
अनेक शांती परिषदा अयशस्वी झाल्या. तालिबान सत्ता काबीज करणार आहे हे आता दिसू लागले आहे. तालिबानचा सध्या असा दावा आहे की
 85-90% टक्के भूभागावर त्यांचा कब्जा आहे. 1996 मध्ये जसा अफगाणिस्तान अश्मयुगात, अंधाराच्या गर्तेत गेला होता ते चिन्ह सध्या दिसत आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानच्या टोळ्या काबूलमध्ये शिरल्या. आणि अफगाणिस्तनमधील सत्ता त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली.

वर्षभरानंतर अफगाणिस्तानात काय परिस्थिती?

पाहिल्या तालीबानी राजवटीप्रमाणेच अत्यंत क्रूर आणि विशेषतः मुली व महिलांसाठी अत्यंत कठोर कायदे कानून राबवले जातील, ही भीती खरी ठरत आहे. महिलांना एकट्याने बाहेर पडण्याची परवानगी नाही आणि बाहेर पडल्यास डोळे सोडुन बाकी शरीर झाकणे बंधनकारक आहे. माध्यमिक शिक्षणाची संमती नाही. भूकबळी आणि गरिबी ह्या दोन उग्र समस्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते अफगाणिस्थानला ४.४ अब्ज डॉलरची गरज असताना आजवर केवळ १.८ अब्ज डॉलरच मिळाले आहे. ६.५ अफगाण विलक्षण गरिबीत असून,६.६ कोटी अफगाण भूकबळी बनण्याच्या उंबरठयावर आहेत. ह्या परिस्थिचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. अनेक कुटुंबांनी जीवंत राहण्यासाठी अंतर्गत अवयव आणि काही घटनांमध्ये पोटच्या मुलांनाही विकल्याचे आढलुन आले आहे.

मी परत सांगतोय, धर्माचा ध्वज जेव्हा अडाण्यांच्या हातात असतो तेव्हा त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब गळतात ते रक्त त्या धर्माचेच असते.


आकाश अर्जुन दहे
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top