माणूस म्हणून माणुसकी
शोधायला मी बाहेर पडलो
स्वार्थ भेटला निर्दयता भेटली
पण माणुसकीचा काही पत्ताच नाही
म्हणलं दवाखान्यात असेल म्हणुन तिथे गेलो
पण दारातच पैसे नाही म्हणून उपचार नाकारलेल्या
एका रुग्णाच्या प्रेताने स्वागत केलं
शोधत शोधत शाळा मी गाठली
तर तिथे सवर्णांच्या माठातून पाणी पिल्यामुळे
शिक्षकाने केलेल्या मारहाणीत जीव गमावलेल्या
मुलाने स्वागत केलं
निराशेने सरळ मंत्रालय मी गाठल
निदान मायबाप सरकार तरी माणुसकी दाखवेल
ह्या विश्वासाने आत प्रवेश करतो झालो
पण ५० खोक्यांचा प्रसाद घेवून सरकार ढेकर देत पडल होत.
राज्य वाऱ्यावर सोडत
परराज्यात नाचगाण्यावर थिरकल होत
शेवटचा पर्याय म्हणून मी न्यायालयात गेलो
कोर्ट भरल होत निकाल वाचला जात होता
बलात्कार खुनाच्या आरोपासाठी
जन्मठेप दिलेल्या ७ जणांना
विशिष्ट जातीचे होते म्हणून
सोडले जात होते
पिडीतेवर दुसऱ्यांदा अत्याचार होत असताना
हा समाज सोयीस्कररीत्या मौन बाळगून होता
फिरून फिरून अखेर एकदाची
सापडली मला माणुसकी
दूर कोण्या खेड्यात
शहरांपासून लांब आपल्याच वेगळ्या विश्वात
या भयाण समाजापासून दूर होती
म्हणूनच कदाचित जिवंत होती
आशेची ज्योत मिन मिन तेवत होती
कारण अखेर मला माणुसकी सापडली होती...!
- वि.rajé