खरंच हा स्वातंत्र्य उत्सव होता का ?

0

 काल महिलांना भारत मातेचा दर्जा देऊन स्वातंत्र्य उत्सव आनंदात पार पडला... दांभिक समाजात समानतेच्य गप्पा लय हाणल्यावर प्रश्न पडतो, 

खरंच हा स्वातंत्र्य उत्सव होता का????

 आज भारतातील महाराष्ट्रामध्ये महिलांची लोकसंख्या पहाता, ४८.१ टक्के इतकी आहे मात्र एवढ्या महिलांन मागे महिला प्रतिनिधी नेतृत्व करणारी महिला संविधानिक न्याय विकासात राजकारणात आहे तरी कुठे....? देशाच्या धोरणात महिलांच्या विकासासाठी महिलांचे स्थान कुठे आहे...?

म्हणजे पुरुषांनी च केंद्रात बसावं मंत्रिमंडळात हीं बसावं, पुरुषांनी देशाचा राज्यकारभार सांभाळावा.... आणि पुरुषांनी त्या त्या पदावर बसून,

लेडीज फर्स्ट म्हणत महिलांचे सशक्तिकरण , सबलीकरण, सक्षमीकरणा नारा द्यावा...हा अधिकार यांना तरी पूर्ण कोणी दिला आहे? 

हेच आहे का स्वातंत्र्य??

मला हीं माझ्या देशावर अभिमान प्रेम आहे. ज्यांनी पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या प्रत्येक स्वातंत्र्यविरांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही इतका आदर आपल्याला असायलाच पाहिजे. पण तो पारतंत्र्यातून मुक्तीचा लढा होता जो गरजेचा होताच पण खरा लढा तर अजूनही बाकीच आहे अर्थात खरं स्वातंत्र्य मिळालं कुठे? हा स्वातंत्र्य उत्सव म्हणवत असताना किती महिलांना प्रश्न पडला असावा? की, 

संविधानाने महिलांना दिलेलं 50% टक्के आरक्षण आज प्रत्यक्षात कुठे आहे ??

आज राजकारणात महिला आहे. परंतु त्याचे प्रमाण पाहता किंवा त्या राजकारणात असून त्यांच्याकडे असणारे अधिकार पाहता ते तरी कुठे??

काल महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खात वाटप सरकारनामा जाहीर होते आणि राज्याच्या मंत्रिमंडळात आज एकही महिला नाही... महिलांच्या विकासासाठी एखाद्या महिला प्रतिनिधी कडे खात असाव हा तर दूरचाच विषय....

देशातील महिलांच्या अनेक समस्या , लहान मुलांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे, शेतीचे प्रश्न... भ्रष्टाचार अनेक समस्या पाहता...

किमान, महिला व बालविकास, शिक्षण खातं तरी एखाद्या महिला प्रतिनिधी कडे असायला हवं होतं... तसहीं महिलांकडे हे नेहमीच एकच खात दिल जाते....जी महिला या दृष्टिकोनातून विचार करू शकेल महिलांच्या महिला भावना समजू शकेल महिलांच्या विकासासाठी काय गरजेचं आहे हे लक्षात घेऊ त्या प्रश्नावर काम करु शकेल....

शेतीचा शोध स्त्री नें लावला परंतु स्त्री कडे कृषी खात नकोय....?

एक स्त्री उत्तम रित्या कुटुंब घरच गृह खात सांभाळते, घरातून पर्यावरण विषय त्यांच्या हाताला असतो, पर्यावरण विषय व्यापक आहे पण या क्षेत्रात सुद्धा स्त्रिया चांगले धोरनात्मक निर्णय घेऊ शकतात पण पर्यावरण किंवा गृह खात महिले कडे नको ?

उद्योग स्त्रियांनी करावे पण उद्योग खात स्त्रियांन कडे नाही?

हे दुर्दैव म्हणावं की हा रचलेला डाव म्हणावं....??

आज महाराष्ट्रामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणाचे इतके मोठे प्रश्न आहेत घरातून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेर शिकायला पाठवण्यासाठी अनेकांचा मोठा संघर्ष आहे.... आज अनेक मुली तश्या आपल्याला प्रगतीपथावर दिसते पण आज मी स्वतः सायकल वर एकटीने महाराष्ट्र फिरलेली मुलगी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात फिरताना मला जे जवळून प्रश्न दिसले ते प्रश्न पाहता मला असं वाटतं की आजही महिलांचे प्रश्न खूप जटील आहेत. किंवा ते एका वर्गाने असे जटील बनवून ठेवलेले आहेत.... आज जेव्हा 

देशाच्या राष्ट्रपती पदावर एक महिला विराजमान होते... आणि त्यांच्या जातीचा सारखा उल्लेख करून त्या महिलेलाच नाही तर राष्ट्रपती पदाला सुद्धा हिणवलं जातं असं म्हणायला वावगं नाही.... या व्यवस्थेत महिलांचा माणूस म्हणून त्या पदांवर स्वीकार कधी केला जाणार आहे खरंच आहे का हे स्वातंत्र्य.??

लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२ इतकी आहे. यामध्ये ५१.९ टक्के पुरुष व ४८.१ टक्के स्त्रिया आहे. (गुगुल वरील माहिती )


४८ टक्के स्त्रियांन मागे एकही महिला प्रतिनिधी मंत्री म्हणुन या मंत्रिमंडळात नाही....

हे कस शक्य होऊ शकत???


इथून खरा मोठा लढा आहे....

इथे विचार करण्याची आज गरज आहे.... देशाच्या विकासात महिलांच्या विकासासाठी महिलांचे स्थान कुठे आहे हा प्रश्न आता प्रत्येक महिलेला पडायला हवा? फक्त प्रश्न पडून चालणार नाही तर त्यासाठी आता या क्षेत्रामध्ये तरुण महिलांनी उतराव लागणार आहे....राजकारणातील हे प्रदूषण आहे.

वर्षानुवर्ष चालत आलेला प्रस्थापितांच वर्चस्व त्यांचीच घराणेशाही त्यांचीच मुलं त्यांच्याच बायका त्यांचेच पोर आजवर राजकारणात लढत आलेले....

आता तुम्ही म्हणाल, सामान्यतून आलेल्या महिला आज राजकारणात नाही आहेत का....असा जेव्हा प्रश्न पुढे उपस्थित होतो तेव्हा विचार करा ? तर आहे ना असून, 

महिलांच्या पाठीवर एखाद्या घराणेशाहीचा थाप ठोकून त्या पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे अधिकार असून त्यांना अधिकार राबवण्याची किती स्वातंत्र्य आहे?

अशाही काही महिला ज्यांनी आरक्षणाचा फायदा करून घेत प्रस्तापित नवऱ्याच्या उरावर निवडणूक लढवली...किमान लढवली ते चांगलच पण त्यांच्याकडे चांगल्या क्षमता आहे अधिकार आहेत परंतु पाहिजे त्या पद्धतीने काम आहे का..?

मात्र लोकशाहीतून आलेल्या सर्वसामान्य महिलांची संख्या किती आहे?

सिनेमा क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या महिला आज राजकारणात उतरवतात... आणि समाज त्यांचा स्वीकार सुद्धा करतो? हे चुकीच आहे असं मला म्हणायचं नाही...

मात्र वर्षानुवर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये सामान्य लोकांसाठी अंतिम घटकांसाठी काम करत असलेल्या महिला जेव्हा राजकारणात उतरतात आशा घेऊन समाजासाठी धोरनात्मक विकासातून काम करण्यासाठी तेव्हा त्यांना लोक निवडून देत नाहीत समाज स्वीकारत नाही?? अशी उदाहरणे आपल्यासमोर बरीच आहे...

खरंतर, 

ही लढाई आता स्त्री स्वातंत्र्याची मुक्तीची असायला हवी....मुळात मुक्ती कोणापासून असावी हा प्रश्नच आहे...?

कारण निसर्गतः निसर्गाने कुठलाही भेद न ठेवता स्त्री पुरुषाला मुक्तता दिली आहे... मुक्ती कोणाला मागण्याची किंवा स्वातंत्र्य कोणाला मागण्याची गरज नसायला हवी होती. पण हीं शोकांतिका आहे.... निसर्गाने निर्माण केलेल्या ज्या दोन पुरुष आणि स्त्री या जाती आहे... त्यातल्या एका जातीने माणूसपणाला बाजूला सारून एका जातीवर असं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आहे... त्या जातीला असं वाटतं की निसर्गाने मलाच बलवान बनवलेल आहे आणि मी स्त्रीजातीचा उद्धार करावा....

आणि याच बलवान जातीने अनेक अशा जाती बनवून ठेवलेल्या ज्या जातीची ठेच मात्र प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वळणावर टोचते...

मोठ मोठ्या सभान मध्ये स्त्रियांच गुणगान गायच आणि दुसरीकडे त्यांना दाबून धरायच? 

मुळात आता स्त्री ने कोणाला स्वातंत्र्य मागण्यापेक्षा स्वतः मानसिक गुलामीच्या बेड्या तोडाव्या लागणार आहे. चार चौकटी बंधनातून मुक्त होणे गरजेचे आहे... स्त्रीने कोणाला मुक्ती मागण्यापेक्षा स्वतः तितकं सक्षम होणे गरजेचे आहे.... आणि हेच अनेक वर्षां मध्ये अनेक स्त्रियांनी केल सुद्धा आहे....

म्हणुन आहे ते स्वातंत्र्य दिसतय तरी....❤


हे लिहीत असताना मी इतकी ही नकारात्मक नाही किंवा मी पुरुषांबद्दल भेद किंवा या व्यवस्थे बद्दल डावलून बोलते असं नाही....किंवा पूर्णच व्यवस्था वाईट आहे असं हीं मला म्हणायचं नाही....


परंतु आज जे काही दिसतंय जे वास्तव आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे ते आपण डोळ्यावरची झापड काढून सत्य पहायला हवं.....

चांगल्या व्यक्ती क्षमता वान महिला राजकारणात का उतरत नाही हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि 

महिला राजकीय साक्षरतेवर प्रश्न चिन्ह आहेतच ? आणि या प्रदूषित व्यवस्थेवर सुद्धा?


जर या मंत्रीमंडळात एकही महिला नसेल?

म्हणजे काय महिलांनी देव देव करत भजन मंडळातच भजन करायच का?


या खात्या मधून होणारा पुढचा विकास नेमका कोणासाठी??


महिला आज कुठल्याच क्षेत्रात कमी नाही....

म्हणुन घरातली होममिनिस्टर बनवून आणि भारत मातेचा दर्जा देऊन चालणार नाही फक्त....

आम्हाला महिला राज नकोय...

ना पुरुष सत्ताक दाभिक राज सुद्धा नकोय....


आम्हाला आमचा सामानतेचा वाटा पाहिजे....आम्हाला आमचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अधिकार पाहिजे!


प्रदूषित होत चालेल्या राजकारणात स्त्रियांनी मानसिक प्रदूषणमुक्ती ची लढाई लढावच लागणार आहे.... ✊🏻

कारण जी निसर्गाकडे निर्मितीची क्षमता आहे ती प्रत्येक स्त्रीकडे सुद्धा आहे आणि ती स्त्री या क्षेत्रात इतकी दुर्बल कशी असू शकते?


मी पर्यावरण विषयाला घेऊन जागृत आहे. या विषयी अभ्यास करतांना दिसते... की स्थानिक पातळी अनेक सामान्य लोक पर्यावरणाविषयी खूप चांगलं काम करत आहेत परंतु पर्यावरणाला हानी पोहोचवणारे अशी बरीच मोठी धोरण निर्णय, योजना सुद्धा राजकीय क्षेत्रातून घेतले जात आहे. आज आरे सारखं घनदाट जंगल तोडलं जातंय ते तेही राजकीय धोरणातून...तर तिथूनच चुकीची धोरण ठरवली जातात... जर निसर्गाचे संवर्धन करण्याचे सूत्र राजकारण्यानकडे आहे. तर चांगल्या धोरणासाठी या सूत्रांमध्ये चांगली सूत्र निर्माण व्हायला हवी...


या ठाम मताची मी आहे....


जागृत प्रणाली ✍️

( 🚴🏻‍♀️महाराष्ट्र फिरतांना दिसलेल आणि सध्या ची परिस्थिती पाहता लिहावं वाटलं.... व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे मला....मी ते बाजवणारच. ✍️) 

Pranali Chikte-7020740660

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top