सोडून द्या हो तुम्ही
रिकामा तो कामधंदा
जीवनातून वगळा तुम्ही
चुगली किंवा निंदा
इतरांबद्दल आपण का
खोलात एवढं शिरायचं
स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देऊन
काम आपलं आपण करायचं
कुणी रिकामा फिरो अथवा
बसो खुशाल आपल्या घरी
तुम्ही जीवन त्याचे चुकूनही
लागू देऊ नका आपल्या उरी
निंदा आणि चुगली खरंच
आपल्या स्वभावाचे रोग
जो तो भोगतो इथे नेहमी
आपल्या कर्माचे सारे भोग
दिवसेंदिवस तुम्ही फक्त
तुमच्या कौशल्यावर द्या भर
निंदानालस्ती करणारे इथे
काम तेच करतात आयुष्यभर
चुकूनही जीवनात तुम्ही
बनू नका निंदानालस्तीचा भाग
दुर्गुण असेल हा स्वभावात तर
आजच करा त्याचा त्याग
- © गणेश रामदास निकम