गावाकडं खुप पूर आलाय सगळं कस उलथापालथ झालय...
आज अचानक लहान बहिणीच्या हाती नागरिकशास्त्रा च पुस्तकं पाहिलं...
अनेकांना नागरिकशास्त्र विषय अवांतर विषय वाटतो....
वाटलं नागरिकशास्त्र समजून घेतले पाहिजे... म्हणून मी 6 वीचे नागरिकशास्त्र वाचायला हातात घेतले...
प्रवास संपल्यावर बरंच चिंतन सुरु असल्यामुळे सध्या अनेक गोष्टी वर विचार करत असतांना... मी मागे वळून पहाते तेव्हा 5 वी ते 10 वी पर्यंत काय शिकली तितकंस खुप काही आठवत नाही...
माझी कदाचित स्मरणशक्ती कमजोर झाली असावी या सोशल मीडिया च्या अती वापरामुळे असं वाटतं कधी कधी....( पण एक चांगल आठवते शाळेत शिकतांना रोज शिकवल्या जाणाऱ्या प्रतिज्ञा आम्ही म्हणायचो ती प्रतिज्ञा कोणी लिहिली असा प्रश्न सरांना विचारल्यावर माहिती नाही असे उत्तरं होते? परंतु बेलाले पान तीन ही भगवंताची देन! हे शिकवलेलं गाणं सरांच चांगल आठवते... पण बेलाच्या झाडाच महत्व सांगितलं असेल असं ही काही आठवत नाही....)
पण इथे आणखी खोलवर जाऊन विचार केल्यास लक्षात येते कदाचित मला न आठवण्यामागे माझा - माझ्या शाळेचा आणि घरचा असा तिघांचाही दोष आहे... अर्थात शिक्षण व्यवस्थेचा चा तितकाच दोष!...
नागरिकशास्त्र विषय आपल्या जीवनाशी किती निगडित आहे. नागरीकशास्त्र म्हणजे समाजातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांचा अभ्यास...अशी व्याख्या साधारण आपण अभ्यासत असतो पण आमच प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी होऊन जाते तरी आमच नागरिकशास्त्र पक्क नसते..असं का....????????
खरंतर या सैध्यातिक अभ्यासक्रमात काहीच तशी कमी नाही... कमी आहे ती प्रात्यक्षिक अभ्यासक्रमात?
एक प्रयोग करून पहा तुमच्या जवळ च्या 6 वी तल्या मुलाला किंवा 9 वीत गेलेल्या विद्यार्थ्यांला स्थानिक प्रशासन संदर्भात विचारून बघा.... काय सांगते?
कधी आपल्या गावची ग्रामपंचायत पाहिली का? गावातले प्रश्न कोण-कोण सोडवू शकते.... गावात पाटलाचे काम काय? गावात तंटामुक्ती अध्यक्ष कशासाठी नेमला जातो...? निवडूनक कश्यासाठी असते....या प्रश्नांची उत्तर 6 वी च्या आणि 10 वी च्या पुस्तकात आहे
हा जर अभ्यासक्रम 6 वी मध्ये आहे... तर या संदर्भात विद्यार्थ्यांना सांगता का येत नाही.... याच कारण म्हणजे आमचे प्रॅक्टिकल शिक्षण कच्चे आहे... ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे त्यांची कामकाज आहेत किंवा या सर्व गोष्टी असतात... पण प्रत्यक्ष जाऊन आम्ही कधी तिथे व्हिजिट देत नाही तिथे काय चालतं हे आम्ही पाहत नाही किंवा महत्त्वाचा आम्हाला आमच्या शिक्षणातून दाखवल्या जात नाही हा मुळ विषय आहे....
बऱ्याच वेळा अनेक आई-वडिलांना त्यांच्या काळात शिक्षण घ्यायला मिळाले नाही किंवा परिस्थिती अभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले पण त्यांना असं वाटते की आम्ही शिकू शकलो नाही पण आमच्या मुलांनी शिकावं आणि त्यांची मुलं शाळेत कॉलेजमध्ये शिकताय.... खरंतर शाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा त्यातून प्रशासन असतील स्थानिक पातळीवर आपल्या प्रश्नांना कसे सोडावे हे जर आमच्या पुस्तकात ज्ञान दिलेल आहे ते आम्हाला कळत नसेल किंवा त्याचा उपयोग आमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा होऊ शकते याची समज येत नसेल किंवा आम्ही करून घेत नसू तर....इथे कुठेतरी प्रश्नचिन्ह?? आहे जे अशिक्षित आई-वडील आहे किंवा ज्यांना फारसं समजत नाही... त्यांना माहितीचा अधिकार माहिती नाही त्यांना बऱ्याच अशा योजनांची माहिती नाही त्यांना माहितीची गरज आहे पण ही माहिती आपल्या मुलाला माहिती असून त्यांनी अभ्यासली असून सुद्धा त्याला जर सांगता येत नसेल तर कुठेतरी शिक्षण चुकतंय???
मी जेव्हा महाराष्ट्र भ्रमणाचा प्रवास करत होते अशा अनेक शाळांना भेटी दिलेल्या ... तेव्हा मी बरेच असे कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत असायचे.....
प्रश्न मात्र निरुत्तर असायचे.....
खरं म्हणजे आज जो काही बहुसंख्या असा वर्ग आहे जो अनेक घटकांपासून वंचित आहेत म्हणतो अनेक जन सामाजिक या विषय काम करतांना पाहतो. तरी प्रश्न सुटत नाही त्याचं कारणच असा आहे की माहितीचा अभाव...
जर शाळेमध्ये 5- 6 व्या वर्गात... नागरिक शास्त्राचे एवढ्या चांगल्या पद्धतीने महत्त्व सांगितलेले आहे समाज म्हणजे काय? समाजाची निर्मिती कशासाठी झाली ? हे जर इतक्या चांगल्या पद्धतीने थोडक्यात मांडणी केली असेल मला वाटतं या ज्ञानाचा उपयोग होणे गरजेचे आहे...
शाळेत शिकतांना सहाव्या वर्गात जर धर्मनिरपेक्षेचे तत्त्व सांगितलेले आहे ... आणि आजच्या युवकांमध्ये धर्माधर्मातला जो काही तांडव आपण पाहतो तू कुठून निर्माण होतो नेमका??
मला वाटतं..
आम्ही जे काही शाळेमध्ये पुस्तकात शिकतो चार भिंतीच्या आत मध्ये.... तेच आम्हाला भिंतीच्या बाहेर नेऊन दाखवलं पाहिजे....
नक्की काय आहे?
वर्गात शंभर मुलं असतील 100 च्या 100 मुलांच्या सगळं काही डोक्यात जात असेल असं ही नाही.... परंतु प्रात्यक्षिक अभ्यास जितका चांगला डोक्यात जातो तितक पुस्तक नुसतं जात नाही..... हे सगळ्यांना माहिती आहे खरंतर यावर अनेक ठिकाणी काम सुद्धा सुरू आहे.... परंतु आजही मोठी शोकांतिका आहे की नागरिक शास्त्र हा विषय अनेकांपासून खूप दूर दूर आहे.....
काल गुरुपौर्णिमा होती.. प्रत्येकानी शुभेच्छा दिल्या...... खरंतर आपले आई-वडील आपल्याला साथ देणारे अनेक जण आपला दुसरा गुरु आपण शिक्षक म्हणत असतो .... अशा याच्यामध्ये आज शिक्षक हा गुरु कुठेतरी या नागरिकशास्त्रापासून दूर झालेला दिसतो... त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिक शास्त्र रुजतांना दिसत नाही...
आज विचार प्रत्येकाने केला पाहिजे... विचार करत असू तर आपलं मत लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे याविषयी बोल पाहिजे चर्चा व्हायला हवी... पालकांनी घरी पाल्यानसोबत बोलायला हवं...... खरंतर म्हणून मला लिहावसं वाटलं.....
नागरिक शास्त्र गौण होत चाललंय त्यामुळे आज सगळीकडे आमचे कायदे आम्हाला मिळणाऱ्या न्याय हक्क आमची कर्तव्य कुठेतरी विसरत चाललेलो आहोत आणि जो काही... देशभरात- जगभरात आज अनेक विषयांचा तांडव सुरू आहे तो भयंकर आहे...
मी जेव्हा पर्यावरणाचा विषयी विचार करते किंवा निसर्गाशी अधिकाधिक जवळ जाते तेव्हा मला असं वाटतं निसर्ग शास्त्र पर्यावरण शास्त्र हे समजून घेत असताना आम्ही आमचं नागरिक शास्त्र सुद्धा तितकच समजून घेतलं पाहिजे कारण ..... कारण नागरिक शास्त्राची निर्मिती किंवा समाजाची निर्मिती ही समाजात राहणारा प्रत्येक व्यक्तीला एकमेकांना मदत होणार एकमेकांनी एकोपाने एकत्र आनंदात जगण्यासाठी इथे जगणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय हक्क अधिकार मिळाला पाहीजे समानतेने जगता आलं पाहिजे....इथल्या नैसर्गिक साधनसंपत्ती ला जपून माणसाने जगले पाहिजे ते एका सुव्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत अगदी वंचित घटक अंतिम माणसापर्यंत पोहचल पाहिजे त्यासाठी या स्थानिक प्रशासनाची निर्मिती समाजानी, समाजासाठी अर्थात लोकशाहने केली आहे...याचे मूलभूत शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण व्यवस्थेने नागरिक शास्त्राची निर्मिती केली... हे ज्ञान जर शालेय जीवनामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना मिळत असेल तर....
याविषयी एव्हडी गफलत का आहे...
प्रश्नचिन्ह कायमच ??
इथे शेवटाला उत्तर हेच येते की जोपर्यंत आमचं शिक्षण आम्हाला प्रात्यक्षिक अनुभवातून शिकवल्या जाणार नाही आम्हाला समजाऊन देणार नाही आणि आम्ही ही समजून घेणार नाही तोपर्यंत हे शास्त्र फक्त नुसतं नावासाठी शास्त्र असणार आहे......
नागरिकशास्त्र आम्ही शिकलो तर...
कदाचित आम्ही आमचे प्रश्न सुद्धा थेट विचारू....?
पण आजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतांना दिसत नाही....
कारण नागरिक शस्त्र सुद्धा आता ऑनलाईन झालाय.....