" हे विश्व किती सुंदर " आहे,त्याची रचना किती विलक्षण आहे,या विश्वात मानवाची निर्मिती झाली आणि ती निर्मिती होण्यासाठी,स्त्री ची पसंती झाली,कारण काय असावं,मातृत्व फक्त स्त्रियांनाच का बहाल झालं असावं?म्हणून घ्यावं म्हंटल, "तिच्या मनाच्या गाभाऱ्याचा ठाव,नक्की अस काय आहे". ज्याने फक्त तिला "मातृत्व" मिळालं,ठाव घेताना कळलं की,स्त्री अशी एकमेव आहे की जिच्यात प्रचंड सहनशक्ती आहे ,कोणत्याही परिस्थिती ती उभी ठाकू शकते, कधी ती घरची लक्ष्मी असते,तर कधी दुर्गा तर कधी असते अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी काली...
विविध अशी तिची रूपे या भूतलावर पाहताना दिसतात,अस म्हणतात की स्त्रियांना समजून घेणं तितकं ही सोप्प नसतं, अगदी खरचं आहे ते,हे अस व्यक्तींमत्त्व असत जे विदुषकासारखं असतं, वरून वेगळं रूप दाखवतं, आतून मात्र खूप गुपितं घेऊन फिरतं. प्राजक्त जसा ओघळतो पण त्यालाही यातना होतात तश्याच यातना हिलाही होतात,पण तरीही आपल्या अंतरीच्या वेदना साऱ्यापासून लपवून ही, खंबीरपणे उभी राहते,फक्त आपल्या कुटुंबासाठी.
'मुलगी शिकली प्रगती झाली' अस आपण नेहमी ऐकतो अगदी खरचं तर आहे,सावित्री शिकली पण थांबली नाही तर कित्येकांच भविष्य तिने घडवलं,तसेच असतं, घरातील स्त्री शिकली की ती सार कुंटुंब शिकवते,मग ते शिक्षण शाळेत जाऊन घेतलेलं असो, की समाजात वावरताना,घेतलेल्या विविध अनुभवाचं असो ते नेहमीच फायदेशीर ठरतं.
स्त्रीच्या मनाचा गाभारा न्हाळताना कळतं की एकाच वेळी किती वेगवेगळ्या भूमिका ती निभावते,ना थकते,ना हार मानते
जशी 'मेरी कोम' उत्तम आईची भूमिका निभावताना स्वतःच अस्तीत्व ही तिने जपलं.झाशीची राणी तिने तर एक वेगळाच इतिहास घडवला,बाळाला उराशी बांधून लढताना जणू हेच सांगितलं की बाळ जवळ असताना,एक आई काहीही करू शकते. स्त्रियांना मुळात कधी स्वतःची चिंता नसते,चिंता असते तर फक्त नि फक्त आपल्या कुटुंबांची त्यांच्या सुखाची,कोणत्याही परिस्थिती हार न मानता ती काहीही साध्य करू शकते.
काळ कोणताही असो आव्हान कोणतंही असो ती यशस्वीपणे त्याला पेलते,मग ते जिजाऊ च्या रुपात स्वराज्य निर्माण करायचं असो किंवा आधुनिक युगातील, कल्पना चावला असो,जिद्द असेल तर काही साध्य करता येतं हे त्या आपल्या कर्तृत्वातून दाखवून देतात,समाजजीवनात स्त्रियांची विविध रूप असतात, कधी आई,कधी पत्नी,कधी सून तर कधी सासू,अशी नानाविविध रूपे असतात तिची,रूपे अनेक असली तरी भूमिका मात्र चोख पार पाडते.
दिवसरात्र ही घरच्यांसाठी झटत असते,कुठेही थकत नसते,सर्वांसाठी जगताना तिचं स्वतःसाठीच जगणं मात्र राहून जात असतं, लेकरांसाठी तर तिची तळमळ अशी असते की त्यांच्या सुखांसाठी कोणतीही झळ सोसते,आपली हिरकणीच नाही का, काय तिचा तो निश्चय शब्दांत कसा मांडता येईल तो, पण लेकराची ओढ कसं बळ देऊन जातं.
'स्त्री' ही अशी शक्ती आहे की ती कोणत्याही परिस्थितून पुन्हा उभी राहू शकते,जस फिलिपिन्स पक्षी राखेतून बाहेर येत यशाची उंच भरारी घेतो,तसेच स्त्री ही कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडतेच,आपली प्रीती राठी आणि लक्ष्मी अग्रवालच पहा ना ऍसिड हल्ला होऊनही त्या पुन्हा किती ,धेर्याने उभारल्या परिस्थिशी दोन हात केले,आणि हेच दाखवून दिले की,"त्यांच्या देहावर हल्ला झाला पण आत्म्यावर नाही आणि त्यातील स्वप्नांवर नाही".
रखरखता अंगारा जसा चटका देतो,तसाच चटका वेळ प्रसंगी हीही देते,मग ते मुलांवर संस्कार करताना असो की,स्वतःच्या चारित्र्य वाचवण्यासाठी असो,ती बरोबर योग्य ते पाऊल उचलते.कोणतीच गोष्ट तिच्यासाठी अशक्य नसतेच,मग ते विमान उडवणं असो नाहीतर रणांगणावर लढणं असो आयुष्याच्या प्रत्येक नागमोड्या वळणातून ती संयम ठेवत तोल सावरून बाहेर पडतेच.
'स्त्री 'हे अस अस्त्र आहे की त्याविषयी जेवढं बोलू कमी,तिच्या मनाच्या गाभाऱ्याला न्हाळताना खूपच आंतरिक वेदना कळतात आणि अनेक रूप समजतात..
शेवटी एवढंच म्हणावं वाटत की
" स्त्री मनाचा गाभारा
आहे खूपच खोल
कारण
स्त्री हा विषयच आहे सखोल".
- प्राजक्ता वाघमारे - सोनावणे