एका दिवसात अनेक वर्षा पासुन मनात राज्य करत असलेली अंधश्रद्धा दूर व्हायची नाही....
एव्हढाच बदल व्हायचा असता तर आज देशाची, स्त्रीजातीची परिस्थिती काहीतरी वेगळी असती...लोकांना आज आपण उपदेश देऊ शकत नाही आणि आपण देऊ ही नये या मताची मी आहे... आपल्या प्रामाणिक प्रत्यक्ष कृतीतुन जे पोचवता येईल ते महत्वाचं वाटते... कारण परिवर्तनाची गती कायमच हळू हळू चालत आली आहे.... आणि आपण ही न थांबता जोमात चालत राहील पाहिजे परिवर्तनाचा वाटसरु बनत.... 🌳💚
खरं म्हणजे आज वटपौर्णिमा....कोणाच्या आस्थे ला ठेच पोचविणे हा हेतू नाही.... खरंतर
आज चा दिवस म्हणजे संस्कृती चा एक उत्सहावाचा भाग आहे. जिथे स्त्रिया एकत्र येऊन वळा च्या झाडाची पूजा करते... सामान्यता सर्वांना हे माहीतच आहे....
गेले काही वर्षां पासुन थोडा का असेना सकारात्मक बदल होतांना आपण पहातोय....आम्ही आमच्या गावात वटपौर्णिमा चे औचित्य साधुन महिलांच्या सहभागातून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून पूजा केली....
प्रयत्न होता...
त्यामध्ये अनेक महिल्या आल्या नाही... त्याच कारण म्हणजे वळा च्या झाडाचे लग्न केले जाते म्हणतात आणि नंतर लग्न झालेल्या झाडाचीच सतीसावित्री ला पुजा करता येते म्हणते....
लग्न नाही झालेल्या झाडाची पूजा महिला करत नाही...? अनेक स्त्रियांना याचं कारण माहिती नाही परंतु परंपरागत जे चाललेल आहे ते चालू देत आहे.... महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाचे लग्न का केलं जातं? हे अनेक वर्षापासून झाडाला सुत गुंडाळनाऱ्यां बाईला अजूनही माहिती नाही? नवरा घरात लाथ मारते मात्र तोच नवरा सात जन्मी पाहिजे म्हणून पूजा करतात... हा प्रत्येकाचा खरं तर वैयक्तिक विषय आहे... परंतु याचे परिणाम सामाजिक वलयातुन पहात असतो...
झाडाचे लग्न ही कुठून कोणी कशी प्रथा सुरू केली .... हे माहिती नाही...
परंतु एका दृष्टिकोनातून झाडाची पूजा महत्त्वाचे वाटते.....
सत्यवानाच्या सावित्रीने जी पूजा केली वडाच्या झाडाची त्या मताची मी नाही... सावित्रीने सत्यवानाला यमराजा कडून मेल्यावर जिवंत सोडविले असं म्हणतात... मला वाटतं असं खरं व्हायचं असतं तर आजपर्यंत झालेल्या विधवा ह्या विधवा नसत्या.... सत्यवानाची सावित्री सोडली... तर ज्योतिबा सावित्री फुले यांचे विचार जर आपण पाहिले.... एका सावित्रीने जगापुढे थोतांड असा चमत्कार जगापुढे मांडला आणि तिचे अनुकरण आज आपण करतोय....दुसरीकडे
मात्र दुसऱ्या सावित्रीने शिक्षणातून तर्कशुद्ध बुद्धीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगापुढे वेगळा चमत्कार मांडला...
सावित्रीबाई मुळे आज अनेक स्रिया शिक्षण घेऊ शकल्या आणि त्यामुळे स्त्रियांना झाडांचे महत्त्व सुद्धा शिक्षणातून कळायला लागले... कारण झाड आहे तर माणसाची वाढ आहे...
हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी शिक्षणच महत्त्वाचे.... वडाचे झाड पर्यावरणीय दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून औषधी वनस्पती असून.... वातावरणात सकारात्मक वातावरण फुलवणार वृक्ष आहे 🌳
वटपौर्णिमा म्हणजे खरं तर ... जे वृक्ष आपल्याला सगळं काही देत आहे त्या वृक्षाप्रति आपण कृतज्ञ होणं हे एक प्रकारचे पूजा माध्यम आहे... या महिन्यामध्ये सर्व काही शेतीचे काम सुरू होतात आणि शेतीच्या कामात महिला कामांमध्ये व्यस्त होतात आणि त्या आधी महिलांच्या एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी... एका मेकी ने एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या.... ज्या झाडाने वर्षानुवर्षे आपली जोपासना केली त्या झाडांची जोपासना सर्व स्त्रियांनी सर्वांनी एकत्र येऊन करायची अशी एक प्रकारची साधना आहे.... परंतु याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं जातं नाही हा वेगळा भाग आहे....
आज पर्यावरणीय समस्या पाहता....
आज प्रत्येक स्त्रियांनी जर ठरवलं की आपल्या वाट्याचे एक झाड लावणार आणि ते जगवणार... किंवा प्रत्येक पुरुषाने ठरवले की मी लावलेल्या झाडाचे पूजन बायको ने करावे तर आज खूप मोठे योगदान स्त्री-पुरुष या वटपौर्णिमेच्या माध्यमातून देऊ शकते....
तोच थोडासा प्रयत्न आम्ही आमच्या गावात केला आहे....
एक मजेशीर गोष्ट म्हणजे...मला इतरांच माहिती नाही... पण माझी आई माझ्या विचारांना शक्य तितकी साथ देते याचे समाधान आहे
( माझ्या सांगण्यावरून कही महिला झाड लावण्याकरीता आल्या होत्या आमच्या सोबत झाड लावल आणि पुन्हा गावात दुसरीकडे लग्न लावलेल्या वळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गेल्या कारण त्याची सात जन्माची इच्छा लग्न झालेलं वळाच झाडंच पूर्ण करु शकते म्हणतात....😁 पण माझ्या आई नी नवं रोपटं लावल त्याचीच पूजा केली ती इतर अंधश्रद्धा आणि सत्य वाणाच्या सावित्री च्या चमत्कारास बळी पडतांना दिसली नाही....आई माझ्या वडीलांना साथ देत ज्योती सावित्रीच्या वाटेवर भूमिका बजावत आहे... 💚बाकी थोडी पूजा तिच्या समाज श्रद्धेचा भाग आहे...ते पूर्ण नाकारून तिच्या आस्थे ला दुःख पोचविणे मला योग्य वाटतं नाही )
दुसरं म्हणजे
(वट पौर्णिमा ला स्रिया पूर्वी गाणी म्हणायच्या, गप्पा मारायच्या...आता मात्र गाणी फक्त फोन म्हणते आणि फोन च विडिओ काढते स्त्रिया नटून सुंदर तयार असतात आणि सेल्फी कार्यक्रम सुरु होतो.....पण त्यांच्यातील कला ही मरत चाली आज.....)
सोबत गावातील महिला 💚
आणि वणी भागातील गुरुदेव सेवा मंडळ
धन्यवाद! 🌳
✍🏻 प्रणाली चिकटे- environment activist