भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसच भवितव्य

0
पूर्वजांनी वाडा बांधल्यावर ६०-७० वर्षांनंतर तो वाडा खिळखिळा होतो, त्याच वैभव नाहीसे व्हायला लागत त्यासाठी त्याची डागडुजी करणे महत्वाची. जर केली नाही तर तो वाडा कधी कोसळेल याची शाश्वती नाही. काँग्रेसची परिस्थिती ही अशा जुनाट वाड्यासारखी, तीचे वैभव नाहीसे झालं. नवीन पिढीने लवकर लक्ष न दिल्याने एक एक विट निसटताना आपण पाहिली. पण भारत जोड़ो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी वाड्याचं वैभव परत आणू इच्छिता. विटा जोडण्यास किती यश प्राप्त होतं हा भविष्याचा प्रश्न.

सात सप्टेंबरला कन्याकुमारी वरून सूरू झालेली पदयात्रा ३५७० KM चा पायी प्रवास 150 दिवसात साध्य करुन फेब्रुवारी मध्ये जम्मू काश्मीर मधे जाण्याचा राहुल गांधींनी त्यांच्या टीमचा मानस आहे. झोपलेले विरोधक काही ना काही करता ही गोष्ट जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशासाठी पूरक. यश अपयश भविष्याच्या गोष्टी पण आपला नेता काही ना काही करतोय हाच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, पक्षाला धीर देणारी गोष्ट. 2014 साली पक्ष पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी अशी पदयात्रा काढायला हवी होती त्यामुळे त्यांची जी बदनामी झाली ती होण्याचा मागोमास राहिला नसता पण देर आये दुरुस्त आये. चोवीस तास राजकारण काळाची गरज झालेली असताना हौशी पणाने राजकारण करणाऱ्या राहुल गांधींना भारत जोडो पदयात्रा करणे असे वाटणे सुद्धा अभिमानास्पद.

         भारत जोडो यात्रेच्या मार्गाचा नकाशा

भारतात पदयात्रा करण्याला मोठा इतिहास आहे शंकराचार्य, बुद्ध यांनी सुद्धा पदयात्रा केले पण त्यांची उद्दिष्ट वेगळी होती : अध्यात्म. आधुनिक काळात गांधीजींनी दांडीयात्रा करून मिठावरील कर कमी करण्यासाठी इंग्रजांवर नामुष्की आणली. त्यानंतर सर्वात जास्त गाजलेली चंद्रशेखर यांची पदयात्रा. (A MAN FROM BALIYA) जनता पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष असणारे चंद्रशेखर यांनी जानेवारी 1983 मध्ये कन्याकुमारीवरून पदयात्रा सुरू केली 4200 किलोमीटरचे अंतर पार करून दिल्लीच्या राजघटपर्यंत त्यांनी ही पदयात्रा केली. त्यानंतर सहा वर्षांनी ते पंतप्रधान झाले. त्यानंतर अडवाणींनी सुद्धा रथयात्रा काढली त्याची फळ त्यांचा पक्ष आज भोगतोय. त्यानंतर YSR, चंद्राबाबू नायडू, दिग्विजय सिंह, जगन मोहन रेड्डी यांनी सुध्दा पदयात्रा काढून त्या त्या वेळेस राजकिय लाभ उठवला.

                 चंद्रशेखर भारताची पदयात्रा करताना

 2024 ची लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर  राहुल गांधींची पदयात्रा काँग्रेसला राजकिय लाभ देऊ शकते. संघटन सोडून गेलेले पक्षाच्या नेत्यांना यामुळे चपराक बसेल. समाज माध्यमांच्या आय टी सेलच्या जमान्यात ही यात्रा नवयुवक राजकारण्यांना दिशा देणारी ठरू शकते. गत दशकात बीजेपीच्या आय टी सेल ला इतके हतबल होताना नाही पहिले जितके ह्या यात्रेत पहिले. राहुल गांधी आणि त्यांची टीम कोणताच मुद्दा बिजेपीच्या हाती लागू देत नाहीय त्यामुळे हतबल आयटी सेलने सरळ राहूल गांधीच्या टी-शर्ट वर निशाणा साधला. यावरून हतबलता दिसतेय. विरोधकांचे राजकरण काँगसच्या वर्तुळाबाहेर चाललेले असताना ह्या यात्रेने ते काँग्रेसच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय. नितिश कुमार यांनी  दिल्लीला आल्यावर पहिल्यांदा राहुल गांधींची भेट घेतली त्याचे एक उदाहरण. 
संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ' चराती चरातो भग: ' म्हणजे जो चालतो त्याच्या नशीब चालते. ह्या यात्रेमुळे उशिरा का होईना काँग्रेस नेतृत्वाला जमिनीवर चालण्याची गरज वाटली. देशात टोकाचे राजकारण, धर्मा धर्मात द्वेष वाढत असताना आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा एवढेच बोलत असताना, महागाई, रोजगार, सामान्य माणसांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा यावर झोपलेले विरोधक या भारत जोडो यात्रेमुळे बोलताय हे भारतातील जिवंत लोकशाहीचे प्रतीकच आहे.

आकाश अर्जुन दहे...
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top