सन 1921 ची गोष्ट ठिकाण म्हैसूरचे लोकप्रिय महाराजा कॉलेज. त्या ठिकाणी एका मोठ्या सभागृहाबाहेर घोड्याच्या बग्गीला फुलांनी सजवायची काम चालू होते. विद्यार्थी ही बग्गी सजवत होते, पण थोडे नाखुशीनेच. कारण त्यांचे प्रिय शिक्षक त्यांना सोडून कोलकत्ता विद्यापीठात शिकवायला जाणार होते. भाषणे, निरोप समारंभ असा औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा तो शिक्षक सभागृहाच्या बाहेर आला. सजवलेल्या बग्गीकडे पाहून थोडे खुश आणि नंतर आश्चर्यचकित झाला. कारण ती बग्गी घोडे चालवणार नव्हते. घोड्यानऐवजी स्वतः मुले बग्गीला घेऊन रेल्वे स्टेशनला जाणार होते. रस्त्यात भरपूर लोकांनी भेटून शिक्षकाला प्रणाम केला. हे शिक्षक होते सर्वपल्ली राधाकृष्ण. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा थोडक्यात परिचय...
त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुत्तानी या तामिळनाडूमधील एका लहानशा गावातील तेलुगू भाषिक कुटुंबात झाला. शाळा आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण लुथेरन मिशन हायस्कूल आणि वेल्लोरच्या वुर्हिस कॉलेजात. प्रतिष्ठित मद्रास ख्रिश्चन कॉलेजातून बी. ए. आणि एम. ए. (तत्त्वज्ञान) या पदव्या. म्हैसूर युनिव्हर्सिटी, प्रेसिडेन्सी कॉलेज- मद्रास, प्रेसिडेन्सी कॉलेज- कोलकाता, बनारस युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे तत्त्वज्ञान आणि ‘तौलनिक धर्माभ्यास’ या विषयांचे अध्यापन. अनेक ग्रंथांचे लेखक. त्यांच्या ग्रंथांतील ‘Two volumes on Indian Philosophy’, ‘The Hindu View of Life’ आणि ‘An idealist View of Life’ हे तीन अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांनी भूषविलेली काही महत्त्वाची पदे : League of Nationsl committee on intellectual co-operation चे सभासद, आंध्र युनिव्हर्सिटी आणि नंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे कु लगुरू, सोव्हिएत रशियामध्ये भारताचे राजदूत, १९५२-१९६२ या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती, १९६२-१९६७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती. काही महत्त्वाचे सन्मान : ब्रिटिश नाइटहूड आणि भारतरत्न. अगदी कमी वयात लग्न. पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार. मृत्यू- १७ एप्रिल १९७५.
आज त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे काही किस्से पाहू,
एक मित्र रवींद्र याने एक निरीक्षण नोंदिले आहे ते असे : तो म्हणाला, ‘राधाकृष्णन आणि मोहम्मद रफी यांचा हा एकत्र फोटो यापूर्वी फार लोकांनी बघितला असेल असं वाटत नाही.’ याआधी त्याने तो पाहिला नव्हता. (हा फोटो राष्ट्रपती भवनात १९६७ साली घेतलेला आहे. ४५ वर्षांच्या रफीसाहेबांनी त्यावेळचे भारताचे ७९ वर्षीय राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडून ‘पद्मश्री’ स्वीकारताना घेतलेला आहे.) पण या दोन थोर व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटल्या तेव्हा त्यांच्यात काय संवाद झाला असेल याबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटतं असं तो म्हणाला. कारण राधाकृष्णन यांचं हिंदुस्थानीचं ज्ञान आणि रफीसाहेबांचं इंग्रजीचं ज्ञान हे त्यांच्यात अर्थपूर्ण संवाद शक्य होईल असं निश्चितच नव्हतं. यामुळे रविंद्रने या दोन ग्रेट व्यक्तींमध्ये घडलेला एक पूर्णपणे काल्पनिक प्रसंग रचला, तो असा : राष्ट्रपती रफीसाहेबांकडे एका गाण्याची फर्माईश करतात. ती पूर्ण करण्यासाठी रफीसाहेब ‘बैजू बावरा’ या सिनेमातलं अतिशय भावपूर्ण असं ‘मन तरपत हरीदर्शन को आज..’ हे गाणं आपल्या स्पिरिच्युअल आवाजात उत्स्फूर्तपणे सादर करतात. तेव्हा मंत्रमुग्ध झालेले राष्ट्रपती स्वत:शीच पुटपुटतात.. ‘‘Hear Nietzsche, how right you were when you said that without music life would be a mistake.’’
डॉ. राधाकृष्णन यांनी भारतासाठी बजावलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे भारत व तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील चिरकालीन मैत्रीसंबंधांची सुरुवात त्यांनी करून दिली. त्यावेळी (१९५२-५३ साली) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे काश्मीरचा प्रश्न वारंवार चर्चेला येई. सुरक्षा परिषदेच्या नकाराधिकार असणाऱ्या पाच देशांपैकी सोव्हिएत युनियन वगळता इतर चार देश कायम भारताच्या विरोधी असत. सोव्हिएत युनियन बहुधा तटस्थ राही व त्यामुळे पाकिस्तानला आपल्या कारवायांसाठी जगाचा पाठिंबा आहे असे मिरवता येई. १९५२ साली असाच एक निकराचा प्रसंग आला आणि सोव्हिएत युनियनने आपला नकाराधिकार भारताच्या बाजूने वापरला तरच भारताची अडचणीतून सुटका होणार होती. त्यावेळी भारताचे सोव्हिएत युनियनमधील राजदूत या नात्याने डॉ. राधाकृष्णन यांनी स्टालिनची भेट घेऊन सोव्हिएत युनियनने भारताच्या बाजूने नकाराधिकार वापरावा यासाठी स्टालिनचे मन वळवले. तिथून पुढे आजपर्यंत भारत आणि सोव्हिएत युनियन (आणि त्याचा आताचा वारस रशिया) यांच्यातील सहकार्य अखंड सुरू आहे.
जाता जाता त्यांची एक कहाणी सांगतो,
14 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेच्या शेवटच्या भेटीत तीन नेत्यांची भाषणे होती. एक चौधरी खलीखुमजा हे मुस्लिमांचे नेतृत्व करत होते. दुसर डॉक्टर राधाकृष्णन आणि तिसरे होते जवाहरलाल नेहरू. एक पेच होता यात नव्या सरकारला अकरा वाजून ११:५९ ला शपथ घ्यायची होती. नेरुंना त्यांचा ऐतिहासिक भाषण सुरू करायचं होतं. नेहरूने डॉक्टर राधाकृष्णन यांना एक चिठ्ठी लिहून दिली की, काहीकरून ११:५९ ला तुम्ही भाषा संपवा. राधाकृष्णन यांनी भाषण द्यायला ऊठले. भारताचा इतिहास, तत्वज्ञान, येणाऱ्या समस्यांवर बोलले. आणि ११:५९ पर्यंत त्यांनी भाषण संपवले त्यानंतर नेहरूंचे ऐतिहासिक tryst with destiny भाषण झाले. राधाकृष्णन यांच प्रत्येकाने ऐकवा असं भाषण झालं त्यांच्या भाषणतला एक छोटासा श्लोक,
"सर्वभूता दिशा मात्मनम सर्वभूतानी कात्यनी समपश्र्चम आत्म्यानीवै स्वराज्यम अभिगच्छति "
" स्वराज्य म्हणजे अशा सहिष्णू स्वभावाचा विकास, जो आपल्या मानवी बंधूंमध्ये ईश्वराचे रूप पाहतो. असहिष्णुता हा आपल्या विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एकमेकांच्या विचारांबद्दल सहिष्णुता हाच एकमेव स्वीकार्य मार्ग आहे."
गेल्या शतकात भारतात ज्या महान व्यक्ती झाल्या. त्यांच्यात डॉक्टर राधाकृष्णन यांचे महत्त्व अनन्यसाधारण आज त्यांचा जन्मदिवस पूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. अक्षरलेखाकडून सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
आकाश अर्जुन दहे..
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली