हत्या
हे विधात्या तू इतका कठोर का झाला. ज्यांना तू जन्म दिला आज ते तुझ्याही पेक्षा मोठे होऊन तूच घडवलेल्या सृष्टी मधल्या काही जीवांचे जीव घ्यायला उठलेत .अरे तूच ना रे तो अमर विहंगम तुलाच म्हणतात ना विहंगम ? तूच ना तो गगणाचा रहिवाशी काही समजत नाहीये आज की हे सगळं कसं मान्य करू मी ! तूच आहेस ना नीलसागरावरचा चतुर खलाशी ? नाही मला सगळ्या गोष्टींचा उलगडा नाही करायचा . कारण मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर पाहिजे. अमर विहंगम तू स्वतःला म्हणवतोस मग तूच जन्माला घातलेले नराधम तुलाच संपवायला उठलेत हे कसं कळत नाही तुला. ज्यांना तू बनवले त्यातलेच काही आम्ही सुद्धा आहोत जे तुझी कुठे तरी हत्या होत असताना रोज पाहतो पण इथे मानसातला माणूसच माणुसकीच्या पलीकडे जाऊन माणसाचीच हत्या करायला कमी नाही मग तुझी चिंता कोणाला ?
अरे तू जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाला आसरा ही तूच देतो आणि तूच जन्माला घातलेल्या जीवापैकी एक कोणी तरी येऊन तोच आसरा क्षणार्धात हिरावून ही घेतो .सृष्टी चालवतो ना रे तू मग हे असे कृत्य झाले तर कोणाकडे न्याय मागायचा आम्ही... कारण इथे आता कोणी नाही रे बाबा,जिवंत शरीर राहिलेत फक्त मेलेले आत्मे घेऊन समाजात वावरत आहेत ...मला सांगायला किळस येतो बलात्कारी मान वर करून समाजात फिरू शकतो मग तू बनवलेली ही सृष्टी आणि या सृष्टीमध्ये असलेली तुझी किमया त्यातलीच एक (विहंगम ) ची हत्या म्हणजे साक्षात तुझीच हत्या करू पाहणाऱ्या त्या नराधमांना कोण रोकणार ...कोण रोकनार हे वादळ हे .....
-- आकाश ना. दोडमणी